बचतगटांच्या माध्यमातून महिला उद्यमशील बनत असून ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था अधिक बळकट होत आहे, असं राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. जागतिक महिला दिनानिमित्त ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ कार्यक्रमाचा राज्यस्तरीय दशकपूर्ती समारंभ आणि कन्यारत्न सन्मान कार्यक्रम आज राजभवन इथं झाला, त्यावेळी ते बोलत होते. महिलांच्या योगदानाशिवाय देशाचा विकास होणं शक्य नाही. वर्ष २०२९ पर्यंत राजकीय क्षेत्रात मिळणाऱ्या आरक्षणामुळे महाराष्ट्र हे ‘महिला राज्य’ होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांचं छायाचित्र असलेल्या ‘रूपे कार्ड’चं अनावरण यावेळी करण्यात आलं. हे कार्ड, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा सत्कार यावेळी करण्यात आला. महिला आणि बालविकास विभाग मंत्री आदिती तटकरे या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
Site Admin | March 8, 2025 8:45 PM | Governor CP Radhakrishnan
बचतगटांच्या माध्यमातून ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था अधिक बळकट होत आहे- राज्यपाल
