भारतीय टपाल विभागानं आपल्या दीडशे वर्षांहून अधिक काळाच्या वाटचालीत संवेदनशील सेवा देऊन लोकांशी भावनिक नाते जोपासले असल्याचं राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. ते आज भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र परिमंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय डाक तिकीट प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. मुंबईच्या जागतिक व्यापार केंद्रात पुढील चार दिवस हे प्रदर्शन सुरु राहणार आहे. यावेळी राज्यपालांच्या हस्ते नाशिक येथील पांडव लेणी वरील स्थायी चित्रे, मूलचंद जी शाह यांच्या जीवनावर आधारित कस्टमाइज्ड माय स्टॅम्प ॲप महापेक्सच्या बोधचिन्हाचही उद्घाटन करण्यात आलं.
Site Admin | January 22, 2025 7:39 PM | Governor CP Radhakrishnan