कृषीप्रधान संस्कृती आणि सर्वाधिक लोकसंख्यांक लोकशाही जपण्याची सामूहिक जबाबदारी सर्वच क्षेत्रांची असली तरी सर्वाधिक टक्का असणाऱ्या कृषी क्षेत्रावर आणि पर्यायानं कृषी पदवीधरांवर ती जास्त आहे, असं प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केलं आहे. ते काल अकोला इथं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या 39 व्या दीक्षांत समारंभात बोलत होते. शाश्वत ग्रामविकासासाठी कृषी विद्यापीठांनी मध्यवर्ती भूमिका बजावावी, असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मातीचा पोत सुधारणं, चांगलं बी-बियाणं, वाण शोधाणं, पाण्याचा काटकसरीनं वापर, तसंच जलपुनर्भरणाच्या क्षेत्रात काम करणं यावर लक्ष देणं गरजेचं आहे, असं राज्यपाल म्हणाले.
Site Admin | February 6, 2025 11:09 AM | कृषी विद्यापीठ | ग्रामविकास | डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ | राज्यपाल सी पी राधाकृष्णन
शाश्वत ग्रामविकासासाठी कृषी विद्यापीठांनी मध्यवर्ती भूमिका बजावण्याचं राज्यपालांचं आवाहन
