गेल्या आर्थिक वर्षामध्ये थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथम स्थानी होता, असं महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. राज्य विधान मंडळाच्या विशेष अधिवेशनामध्ये राज्यपालांनी काल विधीमंडळाच्या संयुक्त सभागृहाला संबोधित केलं. सध्याच्या 2024-25 या आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीतही 1 लाख 13 हजार 236 कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणुक महाराष्ट्रात झाली आहे. ही गुंतवणूक, गेल्या वर्षाच्या थेट परकीय गुंतवणुकीच्या 90 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचं राज्यपाल म्हणाले. राज्य सरकार राबवत असलेल्या योजना, पायाभूत सुविधांचे प्रकल्प अशा मुद्दयाचा आढावा राज्यपालांनी आपल्या भाषणात घेतला.
Site Admin | December 10, 2024 9:41 AM | Governor C.P. Radhakrishnan | Maharashtra