नेत्रदानातून अनेक दृष्टिहीनांना नवी दृष्टी मिळू शकते, त्यामुळे अधिकाधिक जणांनी नेत्रदानाचा संकल्प करावा, असं आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड- नॅब या संस्थेच्या ७४ व्या स्थापना दिनानिमित्त ते काल बोलत होते. या संस्थेच्या स्थापनेत क्रिकेटपटू विजय मर्चंट यांचं योगदान असल्याचं समजल्यानंतर त्यांच्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढल्याची भावना राज्यपालांनी व्यक्त केली. ही संस्था छापखाना, बोलकी पुस्तकं, प्रशिक्षणं अशा उपक्रमांद्वारे अंध, तसंच दृष्टिबाधितांना आशा आणि सक्षमीकरणाची हमी देणारी आहे, असंही त्यांनी नमूद केलं. विविध पुरस्कारांचं वितरणही राज्यपालांच्या हस्ते यावेळी झालं.
Site Admin | January 21, 2025 2:56 PM | eye donation | Governor C.P. Radhakrishnan