कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, सायबर सुरक्षा अशा प्रगत क्षेत्रात शिक्षण देऊन अमरावती विद्यापीठाने रोजगारक्षम विद्यार्थी घडवावेत, असं आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल आणि कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज केलं. अमरावती विद्यापीठाच्या ४१व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. संस्कृत, पाली, इंग्रजी, हिंदी आणि भारतातील इतर भाषांमध्ये साठवलेले ज्ञान मराठीत भाषांतरित व्हावं, जेणेकरून सामान्य माणसाला त्याचा फायदा होईल, असं आवाहनही यावेळी राधाकृष्णन यांनी केलं.
Site Admin | February 23, 2025 3:22 PM | Governor C.P. Radhakrishnan
अमरावती विद्यापीठाने रोजगारक्षम विद्यार्थी घडवावेत, राज्यपालांचं आवाहन
