डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

देशाची प्रगती आणि रोजगारनिर्मितीला चालना देण्याचा सरकारचा दृष्टिकोन – अर्थमंत्री निर्मला सीतारमण

करविषयक कायदे आणि प्रक्रियांचं सुलभीकरण करून त्याद्वारे देशाची प्रगती आणि रोजगार निर्मितीला चालना देण्याचा सरकारचा दृष्टिकोन असल्याची ग्वाही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल लोकसभेत दिली. अर्थ विधेयक 2024 वरच्या चर्चेला त्या उत्तर देतांना त्या बोलत होत्या.

 

गेल्या दशकात कर रचनेत आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. करांमध्ये भरमसाठ वाढ न करता यात सुलभीकरण आणलं आहे. यामुळे पारदर्शकता वाढली आहे, असंही त्या म्हणाल्या. मध्यमवर्गावरचं कराचं ओझं वाढल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला. या उलट, वजावटीत सुधारणा करून मध्यमवर्गाला दिलासा देण्यात आल्याचं त्या म्हणाल्या. अर्थसंकल्पाला मान्यता मिळाल्यानंतर अर्थसंकल्पविषयक प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा