भाषिक आणि सांस्कृतिक वैविध्यतेने परीपूर्ण असलेल्या भारतीय सिनेमाने देशाला एकत्र करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे, असं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका लेखात केलं आहे. एक भारत, श्रेष्ठ भारत हा दृष्टीकोन अधिक बळकट करण्यात सिनेमा हे एक शक्तीशाली साधन आहे, असं वैष्णव म्हणाले. सिनेमा भाषिक आणि प्रादेशिक सीमा ओलांडतो, तसंच जनतेच्या सामायिक भावना आणि अनुभव चितारतो असं वैष्णव यांनी सांगितलं. भारतीय सिनेमाल जागतिक स्तरावर घेऊन जाण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचंही वैष्णव म्हणाले.
Site Admin | October 10, 2024 2:33 PM | Ashwini Vaishnav | India cinema