मराठवाड्यातला दुष्काळ दूर करण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल हिंगोली इथं कावड यात्रेत संबोधित करत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या मदतीने मराठवाड्यातला नदीजोड प्रकल्प राज्य शासन पूर्णत्वास नेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्वसामान्यांना लाभ देणाऱ्या विविध योजना या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेल्या नाहीत, तर त्या कायमस्वरूपी चालणाऱ्या योजना असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. कळमनुरी तालुक्यात प्रस्तावित विपश्यना केंद्राला निधी कमी पडू दिला जाणार नाही, त्याची मान्यता लवकरच देणार असल्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. आमदार संतोष बांगर यांनी कळमनुरीच्या चिंचाळेश्वर महादेव मंदिर ते हिंगोली इथल्या महादेव मंदिरापर्यंतची १८ किलोमीटर कावड यात्रा यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन केलं.
Site Admin | August 13, 2024 10:15 AM | CM Eknath Shinde