कृषी उत्पादनं आणि बागायती उत्पादनांचा शेतकऱ्यांना मिळणारा भाव आणि या उत्पादनांची बाजारातली किरकोळ विक्री किंमत यातली तफावत कमी करण्यासाठी सरकार एक समिती स्थापन करणार आहे, अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री शिवराज चौहान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत एका कृषी परिषदेत बोलत होते. शेतकरी आपलं भाजीपाला ५ रुपये किलो भावानं विकतात आणि किरकोळ बाजारात मात्र तो ५० रुपये किलो भावानं विकला जातो, ही तफावत कमी करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचं काम ही समिती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कृषी संशोधनाचे फायदे प्रयोगशाळेपासून शेतापर्यंत पोहचवण्यासाठी पुढच्या महिन्यापासून ‘कृषी चौपाल’ उपक्रमाचा प्रारंभ केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
Site Admin | October 20, 2024 1:17 PM | Union Agriculture Minister Shivraj Singh Chouhan