सरकारने फेरीवाल्यांबद्दल ठोस धोरण आखावं तोवर सध्या ऐन पावसाळ्यात फेरिवाल्यांवर होत असलेली कारवाई तात्काळ थांबवावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. मुंबईसह राज्यातल्या इतर शहरात अंदाजे ३० लाख फेरीवाले आहेत. २०१४ साली लोकसभेने फेरीवाल्यांसदर्भात कायदा केला. पण तेव्हापासून गेल्या १० वर्षात राज्यातल्या फेरीवाल्यांना कायदेशीर संरक्षण मिळालेलं नाही असं नाना पटोले म्हणाले.
तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकार एकीकडे फेरीवाल्यांना १० हजार रुपयांचे कर्ज देते आणि त्यांच्याच दुकानावर कारवाई करुन ती तोडली जातात. अशाप्रकारे आपण त्यांच्यावर अन्याय करत आहोत. या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन मंगळवारी या मुद्द्यावर चर्चा करू असंही आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.