राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेत सुधारणांसाठी सरकारनं विद्यार्थी आणि पालकांकडून सूचना आणि प्रतिक्रिया मागवल्या आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं समाजमाध्यमांवरच्या संदेशात याबाबत माहिती दिली आहे. डॉ. के. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्यात आली आहे. या महिन्याच्या सात तारखेपर्यंत परीक्षेच्या प्रक्रियेत सुधारणा, डेटा सुरक्षेबाबतचे नियम, परीक्षा यंत्रणेची कार्यपद्धती या गोष्टींवर विद्यार्थी आणि पालक त्यांची मतं व्यक्त करू शकतात, असं त्यात नमूद करण्यात आलं आहे.
Site Admin | July 2, 2024 10:11 AM | National Testing Agency