डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

२०३१-३२ पर्यंत ऊर्जा निर्मितीची क्षमता ८७४ गिगावॉटपर्यंत वाढवण्याची सरकारची योजना

२०३१-३२ पर्यंत ऊर्जा निर्मितीची क्षमता ८७४ गिगावॉटपर्यंत वाढवण्याची सरकारची योजना असल्याचं केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी राज्यसभेत एका लिखित प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. यात कोळसा, लिग्नाईट यासारख्या पारंपरिक तसंच सौर, पवन आणि जल ऊर्जेसारख्या नवीकरणीय ऊर्जास्रोतांचा समावेश असेल असं नाईक म्हणाले. सध्याची ऊर्जा निर्मिती क्षमता ४६२ गिगावॉट असून देशात ऊर्जेची पुरेशी उपलब्धता असल्याचंही त्यांनी सांगितलं. ऊर्जेचा तुटवडा लक्षात घेता सरकारने एप्रिल २०१४ मधे ऊर्जा निर्मितीत २३० गिगावॉट क्षमतेची वाढ केली अशी माहिती नाईक यांनी दिली.
दरम्यान, कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी चर्चा घडवून आणण्याची विरोधी पक्षाची मागमई राज्यसभेचे उपाध्यक्ष हरीवंश यांनी फेटाळून लावली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा