भारत सरकारच्या मदतीनं श्रीलंकेच्या जाफना जिल्ह्यात ९३४ रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या प्रकल्पांना श्रीलंकेच्या सरकारनं मंजुरी दिली आहे. श्रीलंकेच्या व्यवस्थापनानं ही माहिती दिली. जानेवारी २०१७ मध्ये दोन्ही देशांनी या संदर्भात सामंजस्य करार केला होता. या प्रकल्पांतर्गत जवळपास ३ हजार रेन वॉटर हार्वेस्टिंग टाक्या बांधल्या जाणार आहेत. यासाठी ३०० दशलक्ष श्रीलंकन रूपये खर्च केले जाणार आहेत.
Site Admin | July 2, 2024 8:16 PM | रेन वॉटर हार्वेस्टिंग | श्रीलंका