संरक्षण क्षेत्रातली आयात कमी करून आत्मनिर्भरतेवर भर देण्याच्या उद्देशानं सरकारनं पाचवी सकारात्मक स्वदेशीकरण यादी प्रसिद्ध केली आहे. लाइन रिप्लेसमेंट युनिट्स, सुटे भाग, कच्चा माल अशा एकंदर ३४६ वस्तूंचा समावेश या यादीत आहे. याचं आयात मूल्य एक हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे. यापूर्वी या वस्तू फक्त भारतीय उत्पादकांकडूनच खरेदी केल्या जातील, अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये १२ हजारापेक्षा जास्त वस्तू देशातच तयार करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलण्यात आली आहेत. यामुळे स्थानिक उत्पादकांना ७ हजार ५०० कोटी रुपयांपेक्षाही जास्त व्यवसाय मिळाला आहे.
Site Admin | July 16, 2024 3:24 PM | Ministry of Defence