डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 14, 2024 8:19 PM | PM Narendra Modi

printer

शेतकऱ्यांचं हित साधण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

शेतकऱ्यांचं हित साधण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी घेतलेले निर्णय अधोरेखित करत अशा निर्णयांमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल तसंच ग्रामीण भागात अधिक रोजगार निर्माण होतील, असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये व्यक्त केला आहे. देशाच्या अन्न सुरक्षेमध्ये शेतकऱ्यांची मोलाची भूमिका आहे, असं त्यांनी नमूद केलं आहे. कांद्यावरच्या  निर्यात शुल्कात कपात करण्याच्या तसंच खाद्यतेलावरचं आयातशुल्क वाढवण्याच्या निर्णयाचा फायदा शेतकऱ्यांनाच होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा