विशेष गरज असलेल्या व्यक्तींच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असून दिव्यांग व्यक्तींसाठी अनेक विशेष योजना राबवत असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते काल तेलंगणात सिकंदराबादमध्ये मानसिक दुर्बल सबलीकरण राष्ट्रीय संस्था इथं दिव्यांग व्यक्तींना शैक्षणिक सामग्रीचं वाटप केल्यावर बोलत होते. या संस्थेतल्या विदयार्थ्यांना उत्कृष्ट सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. यानंतर त्यांनी ब्रेल पार्क इथं ‘ब्रेल फॉर ऑल’ प्रशिक्षण संस्थेचं उदघाटन केलं.
Site Admin | December 14, 2024 6:58 PM | handicape | Minister Ramdas Athawale