हंगामी आणि प्लॅटफॉर्म कामगारांना सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत आणण्यासाठी सरकार विविध मार्गांचा शोध घेत असल्याचं केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी सांगितलं. नवी दिल्लीत आढावा बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. या कामगारांना योग्य ती सामाजिक सुरक्षा देण्यासाठी सरकार काम करत असल्याचं त्यांनी नमूद केलं. या कामगारांची नोंदणी ही ई-श्रम पोर्टलद्वारे केली जाणार आहे. हंगामी आणि प्लॅटफाॅर्म कामगारांना नियुक्त करणाऱ्यांना कंपन्यांनी त्यांच्या कामगारांची नोंदणी करावी असं सांगितलं जाईल यावर मांडविय यांनी भर दिला.
Site Admin | September 1, 2024 6:56 PM | Dr. Mansukh Mandaviya
हंगामी आणि प्लॅटफॉर्म कामगारांना सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील – मंत्री डॉ. मनसुख मांडविय
