शेतकरी हा देशाचा कणा आहे, देशातील शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी आणि भविष्यातही शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासन कटीबद्ध असेल, असं प्रतिपादन केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज हिंगोली इथं केलं. हिंगोली जिल्ह्यात तोंडापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्रात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
Site Admin | June 18, 2024 7:27 PM | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी | रक्षा खडसे
देशातील शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासन कटीबद्ध – मंत्री रक्षा खडसे
