केंद्रीय लोकसेवा आयोग – युपीएससीला उमेदवारांची ओळख पडताळण्यासाठी आधार आधारित प्रमाणीकरण करण्याची परवानगी केंद्रसरकारने दिली आहे. परीक्षेसाठी नोंदणी करताना तसंच परिक्षेच्या विविध टप्प्यावर आयोगाला हे प्रमाणीकरण करता येईल. बडतर्फ प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांनी खोटी माहिती दाखवून अनेक वेळा युपीएससीची परीक्षा दिल्याच्या प्रकरणानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
Site Admin | August 29, 2024 1:37 PM | UPSC
युपीएससीला उमेदवारांची ओळख पडताळण्यासाठी आधार आधारित प्रमाणीकरण करण्याची परवानगी
