मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यास सरकार अनुकूल आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलतांना यासंदर्भात निकम यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती दिली. ते म्हणाले. मी माननीय उज्वल निकमजी यांना फोन करून विनंती केलेली आहे. त्यांनी मला सांगितले की मला एक दोन दिवस द्या. कारण या केसला अधिक वेळ द्यावा लागणार आहे. त्यानुसार मी निर्णय घेणार आहे. मला असं वाटतं त्यांनी जर होकार दिला, तर निश्चितपणे त्यांची अपॉइंटमेंट आम्ही करू.
विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मात्र, हा खटलाच बीड जिल्ह्याऐवजी दुसऱ्या ठिकाणी चालवावा अशी मागणी केली. छत्रपती संभाजीनगर इथं काल पत्रकार परिषदेत बोलतांना ते म्हणाले, हा खटला केजच्या ऐवजी बीड जिल्हा सोडून इतरत्र चालवला पाहिजे. अजून एक मोबाईल जप्त केला या मोबाईलमध्ये काय काय आहे, कोणाकोणाचे फोन आले, कोणाकोणाचा सीडीआर रेकॉर्ड अजूनही पोलिसांनी सीआयडीला जाहीर केलेलं नाही. मला वाटतं हे जाहीर करायला पाहिजे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर आपल्या मंत्रिपदी राहण्यामुळे काहीही परिणाम होणार नसल्याचं, अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून सर्व आरोपींना फासावर चढवण्याची मागणी मुंडे यांनी केली, एक तर पोलीस प्रशासन, सीआयडी हे अतिशय व्यवस्थितपणानं तपास करतंय.
आमच्या दृष्टीने दिवंगत संतोष देशमुखची ज्यांनी हत्या केली आहे, त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन, राहिलेले जे काही आरोपी त्यात लगेचच चार्जशीट दाखल करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या हत्याकारांना फाशीची शिक्षा मिळावी. हा तपास न्यायलीन पण होणार आहे. त्यामुळे त्या तपासाशी कुठल्याही प्रकारचा प्रभाव मी मंत्री म्हणून राहून होऊच शकत नाही. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणी स्थापन विशेष तपास पथक – एसआयटी आणि सीआयडीच्या अधिकार्यांनी बीड जिल्ह्यात तपासाला सुरुवात केली आहे. या पथकांनी काल दोन बैठका घेऊन तसंच बीड, केज, मस्साजोग अशा विविध ठिकाणी भेट देऊन संबंधितांची चौकशी केली.