ऑनलाइन गैरव्यवहारांच्या वाढत्या धोक्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार आणि मेटा कंपनीनं स्कॅम से बचो हे अभियान सुरू केलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, गृह मंत्रालय तसंच भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र यांनी मिळून या अभियानाचा आराखडा निश्चित केला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्या उपस्थितीत या अभियानाचा काल नवी दिल्लीत प्रारंभ करण्यात आला.
डिजिटल सुरक्षा आणि सतर्कता याबाबतच्या सरकारच्या दृष्टीकोनाचं प्रतिबिंब यामध्ये आहे हा उपक्रम अगदी योग्य वेळी सुरू झाला असून ऑनलाइन घोटाळ्याचा वाढता धोका पाहता नागरिकांच्या हितासाठी केलेली ही आवश्यक उपाययोजना आहे असं जाजू यावेळी म्हणाले. डिजिटल इंडिया अभियानामुळे देशातली इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 90 अब्जांवर गेली आहे. त्याचवेळी सायबर गुन्ह्यांची संख्याही वाढते आहे असं त्यांनी सांगितलं.