प्रस्तावित महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याच्या आधारे शहरी नक्षलवादाच्या नावाखाली पुरोगामी चळवळींना लक्ष्य करण्याचा सरकारचा उद्देश आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. ब्रिटिश सरकारनं स्वातंत्र्यपूर्व काळात आणलेल्या रैालेट ॲक्टच्या धर्तीवर आधारलेला हा कायदा सरकार अध्यादेशाद्वारे आणत असल्याचं पाटील यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. या कायद्याद्वारे पोलिसांना अमर्याद अधिकार दिले जाणार असून कोणतंही कारण न दाखवता ते एखाद्या संघटनेला ‘बेकायदेशीर’ म्हणून घोषित करू शकणार असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.
Site Admin | July 15, 2024 7:07 PM | Jayant Patil