देशात विजेवर चालणाऱ्या वाहनांचा वापर वाढावा यासाठी केंद्र सरकार काम करत असून भारताला अशा वाहनांचं केंद्र बनवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याची माहिती केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एचडी कुमारस्वामी यांनी आज दिली. नवी दिल्ली इथं इलेक्ट्रिक मोबिलिटी अर्थात विजेवर चालणाऱ्या वाहतुकीच्या राष्ट्रीय परिषदेला ते संबोधित करत होते. देशात २०७० पर्यंत कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण शून्य व्हावं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचंही ते यावेळी म्हणाले. या परिषदेची संकल्पना विकसित भारत – इलेक्ट्रिक मोबिलिटी केंद्र अशी होती.
Site Admin | September 4, 2024 1:36 PM | इलेक्ट्रिक मोबिलिटी | मंत्री एचडी कुमारस्वामी