डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सरकारी योजनांचे फायदे तळागाळातल्या नागरिकांपर्यंत पोहोचावेत, याकरता राज्यपालांनी पुढाकार घ्यावा – राष्ट्रपती

राज्यपालांच्या दोन दिवसीय परिषदेचा काल राष्ट्रपती भवनात समारोप झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एकमेकांच्या अनुभवातून शिकण्याच्या भावनेनं सर्वसमावेशक चर्चा करण्याच्या राज्यपालांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं. सरकारी योजनांचे फायदे तळागाळातल्या नागरिकांपर्यंत पोहोचावेत, विशेषतः अनुसूचित जाती- जमाती आणि आदिवासींना या योजनांचा लाभ मिळावा याकरता राज्यपालांनी पुढाकार घ्यावा असं त्यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात सांगितलं.

आदर्श राज्याचा वस्तुपाठ प्रस्थापित करणं ही राज्यपालांची जबाबदारी असून प्रभावी कामकाजासाठी राज्यपालांनी संबंधित राज्य सरकारांशी सतत संवाद साधावा असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी यावेळी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यपालांना राजभवनात शासनाचं आदर्श मॉडेल विकसित करण्याचं आवाहन केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील परिषदेला उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा