विधानसभा निवडणुका, तसंच पोटनिवडणुका सुरू असलेल्या महाराष्ट्र, झारखंड आणि इतर राज्यांमधून निवडणूक आयोगाच्या संस्थांनी आत्तापर्यंत पाचशे 58 कोटी रुपयांची रोकड, मद्य, वाटपाच्या वस्तू, अमली पदार्थ आणि मौल्यवान धातू जप्त केले आहेत. महाराष्ट्रात विविध कारवाईंमध्ये 280 कोटी रुपयांचा, तर झारखंडमध्ये 158 कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत ही रक्कम तिप्पट असल्याचं निवडणूक आयोगानं नमूद केलं आहे. निवडणुकांदरम्यान रोकड आणि विविध वस्तूंचं बेकायदा वाटप करणाऱ्या कोणाबाबतही हयगय करू नये असे स्पर्ष्ट निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी राजीवकुमार यांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.