‘‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’’ योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या महिन्यात ४ लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पास मिळाले आहेत. १८ जूनला ही योजना सुरु झाली. त्यानंतर केवळ १२ दिवसात ४ लाख ३ हजार २९४ विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाऊन एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवास पास वितरित केले. ही संख्या गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत सुमारे ८३ हजारांनी जास्त आहे. तसंच उत्पन्नही २६ कोटी रुपयांनी वाढलं आहे. जुलै महिन्यातही अशाच पद्धतीनं एसटी कर्मचारी थेट शाळेत जाऊन पास वितरित करत असल्याचं एसटी महामंडळाच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे.