यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत देशातील थेट परदेशी गुंतवणुकीत अर्थात एफडीआयमध्ये जोरदार वाढ झाली असून ती गेल्या वर्षीच्या तुलनेत 45 टक्क्यांनी वाढून 29 बिलियन डॉलर्सच्या वर गेली आहे. यावर्षी आलेल्या एफडीआयचा प्रामुख्यानं सेवा, संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर, दूरसंचार, वाहन, औषधनिर्मिती आणि रसायनं या अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाच्या क्षेत्रांना लाभ झाला असल्याचं उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाकडून सांगण्यात आलं. एफडीआय मध्ये आलेल्या ओघाचा परिणाम गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात वाढ आणि रोजगार निर्मितीच्या रुपानं दिसून येणार आहे. वर्तमान आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीतही एफडीआयमध्ये गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 43 टक्क्यांनी वाढ झाली असून ती 13 बिलियन डॉलर्सच्या वर गेली आहे.
Site Admin | December 3, 2024 10:25 AM | एफडीआय | परदेशी गुंतवणुक