राष्ट्रीय पंचायतराज दिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरीबद्दल गोंदिया जिल्ह्यातल्या डव्वा ग्रामपंचायतीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज हवामान कृषी पंचायत पुरस्कार प्रदान करण्यात आला. बिहारमध्ये मधुबनी इथे पंचायती राज मंत्रालयाकडून हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा पुरस्कार सरपंच योगेश्वरी चौधरी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मानचिन्ह, १ कोटी रुपये रोख आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार कर्नाटकातल्या हसन जिल्ह्यातल्या बिरदहळ्ळी ग्रामपंचायतीनं मिळवला आहे. तर तिसरा क्रमांक बिहारमधल्या समस्तीपूर जिल्ह्यातल्या मोतीपूर ग्रामपंचायतीला मिळाला आहे.