मनोरंजन विश्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या गोल्डन ग्लोब पुरस्काराच्या शर्यतीतून भारताचा पायल कपाडिया दिग्दर्शित ‘ऑल वी इमेजिन एज लाइट’ हा चित्रपट बाहेर पडला असून हा पुरस्कार जाक ओडियार्ड दिग्दर्शित ‘एमेलिया पेरेज’ स्पॅनिश या चित्रपटाला जाहीर झाला आहे.
`
गोल्डन ग्लोब पुरस्कारातल्या इंग्रजी सोडून इतर भाषांमधल्या चित्रपटांसाठीच्या विभागात उत्कृष्ट चित्रपटासाठी अंतिम मानांकनात भारतीय चित्रपटाला जागा मिळण्याची ही पहिलीच वेळ असून उत्कृष्ट दिग्दर्शकांसाठीच्या नामांकनात याच चित्रपटाच्या दिग्दर्शिका पायल कपाडिया यांनाही मानाचं स्थान मिळालं आहे. नुकत्याच पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या कान महोत्सवात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती .