सीमाशुल्क विभागाच्या मुंबई विमानतळ आयुक्तालयाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर वेगवेगळ्या वेळी केलेल्या कारवाईत १८ किलोपेक्षा जास्त वजनाचं सोनं जप्त केलं. २५ जून ते ३० जून या कालावधीत ही मोहीम राबवण्यात आली. मेणात मिसळलेली पावडर, दागदागिने, सोन्याच्या कांड्या, अशा वेगवेगळ्या स्वरुपात हे सोनं प्रवाशांनी अंतर्वस्त्र आणि शरीरावर लपवून आणलं होतं. याप्रकरणी दोन परदेशी नागरिकांसह ६ भारतीय प्रवाशांनाही अटक करण्यात आली आहे.