अमेरिकेनं जाहीर केलेल्या करकपातीमुळं सोनं, चांदीच्या दरातही आज मोठी घसरण झाली. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएनशननं दिलेल्या दरांनुसार सोनं सुमारे २ हजार रुपये तोळा आणि चांदी अडीच हजार रुपये किलोनं स्वस्त झाली. त्यामुळं २२ कॅरेट सोनं तोळ्यामागे ८९ हजार ५०० रुपये आणि चांदी किलोमागे ९३ हजार १०० रुपये दरानं मिळत होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं प्रति औंस ३ हजार २०१ डॉलरच्या उच्चांकी पातळीवरुन ३ हजार ६० डॉलर प्रति औंस पर्यंत घसरलं होतं.
कच्च तेल २ पूर्णांक २१ शतांश टक्क्यांनी घसरुन ६४ डॉलर २४ सेंट प्रति डॉलर प्रति बॅरलवर आलं. ट्रम्प यांनी नव्या करांची घोषणा केल्यापासून कच्चं तेल १४ टक्क्यांनी स्वस्त झालंय.