अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या करधोरणामुळे गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराऐवजी सोन्यात गुंतवणूक वाढवली आहे. त्यामुळं आज सोनं तोळ्यामागे सुमारे हजार रुपयांनी महाग झालं. आज २४ कॅरेट सोन्याचे दर तोळ्यामागे ८८ हजार २३५ रुपये इतके झाले. २२ कॅरेट सोन्याचे दर तोळ्यामागे ८७ हजार ८९२ रुपये इतका झाले आहेत.
चांदी २ हजार रुपयांनी महाग होऊन किलोमागे ९७ हजार ५०० रुपयांवर पोहोचली.