दररोज उच्चांकी पातळी गाठण्याची चढाओढ सोन्या-चांदीच्या दरात आजही कायम राहिली. त्यामुळं सोनं आणि चांदी आज सुमारे दीड हजार रुपयांनी महाग झालं. मुंबईच्या बाजारपेठेत २४ कॅरेट सोनं ९७ हजार ४१७ रुपये तोळा, २२ कॅरेट सोनं ९५ हजार रुपये तोळा, तर चांदी सुमारे ९९ हजार ५०० रुपये किलो दराने मिळत होती.
भारतीय वायदे बाजारात सोन्यानं पहिल्यांदाच ९५ हजार रुपयांची पातळी ओलांडली. अमेरिकी वायदे बाजारात पहिल्यांदाच सोन्याचे दर ३ हजार ३०० डॉलर प्रति औंस या दराच्या पलीकडे गेले आहेत.