जागतिक स्तरावरील वस्त्रोद्योग प्रदर्शन अर्थात भारत टेक्स पुढील वर्षी १४ ते १७ फेब्रुवारीदरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपम तसंच नॉइडातील भारत एक्सपो केंद्र आणि मार्ट इथं आयोजित करण्यात येणार आहे. अशी घोषणा केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी काल नवी दिल्ली इथं केली. केंद्र सरकार आणि वस्त्रोद्योगातील विविध कंपन्यांनी हे योजन केलं आहे. ५ हजार उद्योगांचे प्रतिनिधी आणि ६ हजारपेक्षा जास्त विक्रेते या उपक्रमांत सहभागी होणार आहेत.
हे प्रदर्शन 5Fअर्थात वस्त्र धाग्यांसाठी शेती, उद्योग, फॅशन, परदेशी निर्यातीसाठी वस्त्र अशा संकल्पनेवर आधारित आहे. संपूर्ण जगाचं लक्ष भारतावर आहे आणि भारतीय कापडाचं जागतिक स्तरावर विशेष आकर्षण आहे. त्यामुळे या प्रदर्शनाला महत्व आहे, असंही सिंग यावेळी बोलताना म्हणाले.
Site Admin | September 5, 2024 10:35 AM | Bharat Tex 2025 | Union Textile Minister Giriraj Singh