नवी दिल्लीत आज पासून ९ वे जागतिक तंत्रज्ञान संमेलन सुरु होत आहे. ४० देशातले दीडशेहून अधिक वक्ते या संमेलनात सहभागी होत आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात एकूण ४० सत्रे होणार आहेत.
या वर्षीच्या संमेलनाचा विषय संभावना अर्थात शक्यता असा असून यामध्ये तांत्रिक आव्हाने आणि संधींवर चर्चा होणार आहे. या संमेलनात मुख्य भाषण, मंत्रीस्तरीय चर्चा, तज्ञ समितीस्तरीय आणि राजकीय स्तरावरील चर्चा होणार आहे.