संयुक्त अरब अमिरातीनं अझरबैजानमध्ये आयोजित COP29 दरम्यान “ग्लोबल एनर्जी एफिशिएन्सी अलायन्स” स्थापन करण्याच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची सुरुवात केली आहे. 2030 पर्यंत जागतिक ऊर्जा कार्यक्षमता दर दुप्पट करणे आणि उत्सर्जनात लक्षणीय घट होण्यास हातभार लावणे हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. हा उपक्रम COP28 मधील ‘UAE एकमत’ या संकल्पनेवर आधारित आहे. UAE एकमतनं कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि शाश्वत संसाधन व्यवस्थापनाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध देश आणि संस्था याना एकत्र आणलं. संयुक्त अरब अमिरातीनं ऊर्जा कार्यक्षमतेत आपलं कौशल्य सामायिक करून, ज्ञानाच्या देवणघेवाणीला प्रोत्साहन देऊन आणि खाजगी क्षेत्रासह प्रभावी भागीदारी मॉडेल तयार करून या युतीचं नेतृत्व करण्याची योजना आखली आहे. आफ्रिकन राष्ट्रांना मदत करण्यावर विशेष भर देऊन सर्वोत्तम पद्धतीचं संकलन आणि प्रसार करण्यावर ही युती लक्ष केंद्रित करेल. आफ्रिका खंडात वित्तपुरवठयाचे विविध पर्याय विकसित करणे तसंच शाश्वत उर्जेच्या प्रगतीकरीता महत्त्वपूर्ण तांत्रिक सहकार्य देणे यावर लक्ष देण्यात येईल.
Site Admin | November 17, 2024 11:44 AM | #COP29 | Global Energy Efficiency Alliance | UAE