मध्यपूर्वेत तणाव वाढल्यामुळे हवाई वाहतुक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. फ्लाईट रडार २४च्या माहितीनुसार, जगभरातल्या विमान कंपन्या त्यांची विमानं अन्य मार्गाने वळवत आहेत किंवा रद्द करत आहेत, तर लेबनॉन, इस्रायल आणि कुवेतमधील प्रादेशिक विमान उड्डाणांना विलंब होत आहे. युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी (EASA) ने सर्व युरोपियन विमान कंपन्यांना इराणी हवाई क्षेत्र टाळण्याचा सल्ला दिला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळातली ८५ टक्के विमानांची उड्डाणं प्रभावित झाल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.
Site Admin | October 3, 2024 1:30 PM | Global Air Travel