राज्यातलं महायुतीचं भ्रष्ट सरकार हटवून महाविकास आघाडीचं सरकार आणा, असं आवाहन काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केलं आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा विजय मिळाल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सेल विभागाच्या वतीने प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा दादरच्या शिवाजी मंदिरात सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
काँग्रेसच्या विविध सेल आणि विभागाचं कार्य महत्वाचे ठरले आहे. काँग्रेसच्या ५ न्याय आणि २५ गॅरंटीचं न्यायपत्र घरोघरी पोहचवण्याचं काम सेल विभागानं केलं आहे. लोकसभेची लढाई जिंकलेली असली तरी संघर्ष अजून संपलेला नसून विधानसभा निवडणुकीतही असेच काम करुन विजयी पताका फडकवा, असं आवाहन नाना पटोले यांनी यावेळी केलं.
Site Admin | July 3, 2024 7:27 PM | काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला | दादरच्या शिवाजी मंदिर
राज्यातलं महायुतीचं भ्रष्ट सरकार हटवून महाविकास आघाडीचं सरकार आणा- काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला
