जर्मनीमधे मुदतपूर्व निवडणुकीचा मार्ग मोकळा करण्यासाठी राष्ट्रपती फ्रँक-वॉल्टर स्टेनमिअर यांनी आज संसदेचं कनिष्ठ सभागृह विसर्जित केलं. प्रधानमंत्री ओलाफ स्कोल्झ यांचं सरकार कोसळ्यामुळे येत्या २३ फेब्रुवारीला ही निवडणुक होणार आहे. नवं सरकार स्थापन होईपर्यंत ओलाफ स्कोल्झ काळजीवाहू सरकारचे प्रमुख म्हणून काम करतील.