डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

February 23, 2025 1:47 PM | Election | Germany

printer

जर्मनीत सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान

जर्मनीत आज सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ शोल्ज यांचं सरकार कोसळल्यामुळे ही निवडणूक  होत आहे. या निवडणुकीत ओलाफ शोल्ज आणि फ्रेडरिक मर्झ यांच्या आघाड्यांमधे चुरशीची लढत आहे. जर्मनीची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं आणि युरोपमधे देशाला महत्वाचं स्थान मिळवून देण्याचं आश्वासन मर्झ यांनी दिलं आहे. तर देशातल्या अति उजव्या शक्तिंविरुद्ध केवळ आपणच लढू शकतो, असं शोल्ज यांनी म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा