डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जगप्रसिद्ध मुष्टियोद्धा जॉर्ज फोरमन यांचं निधन

     जगप्रसिद्ध  मुष्टियोद्धा जॉर्ज फोरमन यांचं काल रात्री निधन झालं. ते ७६ वर्षांचे होते. बॉक्सिंग रिंगमधले ‘बिग जॉर्ज’ म्हणून ओळखले जाणारे, फोरमन, यांची कारकीर्द बॉक्सिंग इतिहासातली सर्वात अतुलनीय आणि दिर्घ काळाची ठरली.

 

१९६८ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत  सुवर्णपदक जिंकून त्यांनी जागतिक पटलावर पहिल्यांदाच आपलं नाव कोरलं. त्यानंतर ७० च्या दशकात आणि १९९४ मध्ये असं दोनदा ‘हेवीवेट’ जागतिक अजिंक्यपद जिंकलं. तसंच वयाच्या ४५ व्या वर्षी ते जगातले सर्वाधिक वयाचे ‘हेवीवेट चॅम्पियन’ ठरले. 

 

फोरमन यांच्या निधनाबद्दल दिग्गज मुष्टियोद्धा माइक टायसन आणि जेक पॉल यांच्यासह आंतरराष्ट्रीय क्रीडाक्षेत्रातल्या मान्यवरांनी  शोक व्यक्त केला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा