लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज भारताचे लष्करप्रमुख म्हणून नवी दिल्ली इथं पदभार स्वीकारला. लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी १९८४ ला भारतीय लष्करातल्या सेवेला सुरुवात केली होती. आपल्या चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी विवध पदांवर काम केलं आहे. उप लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती होण्याआधी त्यांनी पायदळाचे मुख्य संचालक तसंच जनरल ऑफीसर कमांड इन चीफ म्हणूनही काम केलं होतं. द्विवेदी यांना आतापर्यंत परम विशिष्ट सेवा पदक आणि अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आलं आहे.
Site Admin | June 30, 2024 1:26 PM | लष्करप्रमुख | लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी