चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी अर्थात स्थूल राष्ट्रीय उत्पादन ६.२ टक्के इतका वाढला आहे. दुसऱ्या तिमाहीत हा दर ५.६ टक्के इतका होता. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज सुधारित आकडेवारी जारी केली आहे. यामुळे जगातली सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारतानं आपलं स्थान कायम ठेवलं आहे. चालू आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी साडे ६ टक्क्यांनी वाढण्याची आशा या आकडेवारी व्यक्त केली आहे.
२०२३-२४ या आर्थिक वर्षात हा दर ९.२ टक्के इतका होता. कोरोनानंतरच्या आर्थिक वर्षाचा अपवाद वगळता हा गेल्या १२ वर्षातला सर्वाधिक दर आहे.