हमास आणि इस्राइल यांच्यात सुरू असलेल युद्ध तत्काळ थांबवाव या मागणीसाठी काल शेकडो पॅलेस्टाईन नागरिकांनी गाजा पट्टीच्या उत्तर भागात निदर्शने केली. हातात युद्धाच्या विरुद्ध फलक झळकवत आणि घोषणा देत त्यांनी ही निदर्शने केली.
गेले 17 महीने चाललेल्या या युद्धमुळे गाजा पट्टी पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहे. इस्राइलने आपल्या बंधकांना मुक्त करण्यासाठी हमासवर दबाव आणण्यासाठी या महिन्याच्या 2 तारखेपासून इस्राइलने सर्व प्रकारच साहाय्य बंद केल असून त्यामुळे मानविय दृष्टिकोनातून नागरिकांची स्थिति अधिक गंभीर झाली आहे.