इस्राइलचं हवाई दल आणि तोफखान्यानं केलेल्या हल्ल्यात ४२ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला असून दीडशेहून अधिक जण जखमी झाले. मध्य गाझातल्या नुसेईरत विस्थापित छावणीवर शुक्रवारी सकाळपासून हा हल्ला सुरू होता. गाझामधल्या नागरिकांवर हल्ले करु नये यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं इस्राइलवर दबाव टाकावा, असं आवाहन गाझातल्या सरकारनं केलं आहे. राफा आणि मध्य गाझामध्ये दहशतवाद्यांना ठार करणं, त्यांची ठिकाणं आणि शस्र उद्ध्वस्त करण्यासाठी हे हल्ले केल्याचं इस्राइली सुरक्षा दलानं म्हटलं आहे.
Site Admin | November 3, 2024 2:16 PM | gaza attack
इस्राइलचं हवाई दल आणि तोफखान्यानं केलेल्या हल्ल्यात ४२ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू
