पाच दिवसांच्या गणपतींना काल निरोप देण्यात आला. मुंबईत काल सुमारे ३७ हजार घरगुती आणि १ हजार सार्वजनिक गणपतींचं विसर्जन झालं. बृहन्मुंबई महानगर पालिकेनं त्यासाठी कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करून दिली होती. राजभवन इथल्या गणपतीचं विसर्जनही राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या सूचनेनुसार, आवारातल्या कृत्रिम हौदात करण्यात आलं. राज भवनात स्थापन केलेली शाडूची मूर्ती नाशिक मध्यवर्ती कारागृहातल्या एका कैद्यानं बनवली होती.
आज गौरींचं विसर्जन होणार आहे. काल घरोघरी या माहेरवाशिणींची पूजा करून गोडाधोडाचं जेवण देण्यात आलं. आजच्या विसर्जनासाठी मुंबईतल्या वाहतुकीचं नियमन करण्यात आलं असून पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला आहे.