डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 18, 2024 3:22 PM | Ganpati Visarjan

printer

गणेशविसर्जनाच्या वेळी ८ जणांचा मृत्यू

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान राज्यभरात विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे. धुळे शहराजवळ चितोड गावात विसर्जनाच्या मिरवणुकीत ट्रॅक्टरखाली आल्यानं काल तीन बालकांचा मृत्यू झाला, तर इतर सहा जण जखमी झाले. धुळे शहरात काल संध्याकाळी दोन सख्ख्या भावांचा पांझरा नदीत बुडून मृत्यू झाला. नाशिकजवळच्या पाथर्डी इथं नदीत गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला तर अन्य एका घटनेत चुंचाळे गावाजवळ एक जण डोहात बुडाला. त्याचा शोध सुरू आहे. अमरावतीच्या ईसापूर शहापूर इथं गणपती विसर्जनासाठी गेलेले तिघे पूर्णा नदीत वाहून गेले. त्यातल्या एकाचा मृतदेह मिळाला असून इतर दोघांचा शोध सुरू आहे. नीरा नरसिंहपूर इथल्या नदीपात्रात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या मुलाचा शोध अद्याप जारी आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा