पुणे शहरातल्या कसबा पेठ आणि तांबडी जोगेश्वरी या मानाच्या दोन गणपतींचं विसर्जन झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज ३७ हजार ८०५ खासगी, तर ६६ सार्वजनिक गणपतींचं विसर्जन होत आहे. धुळे जिल्ह्यात ४१६ मंडळांकडून गणेश विसर्जन करण्यात येत आहे. यात ३९२ सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचा समावेश आहे. १३ खासगी तर ११ ठिकाणी एक गाव एक गणपतीचे विसर्जन करण्यात येत आहे.
बुलढाणा जिल्ह्यात आज सकाळपासून गणेश विसर्जन सुरू असून शेगावमध्ये झालेले किरकोळ प्रकार वगळता सर्वत्र मिरवणुका शांततेत सुरू आहेत. वाशिम शहरात सकाळपासून विसर्जन मिरवणूक सुरू असून या मिरवणुकीमध्ये डीजे या आधुनिक वाद्यासह पारंपरिक बँड, डफडे, ढोल-ताशे यांच्या गजरात गणपती बाप्पाला निरोप देण्यात येत आहे.