गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. ७० वर्षाहून जास्त काळाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत लता मंगेशकरांनी गायलेली २५ हजारांपेक्षा जास्त गाणी ध्वनिमुद्रीत झाली. केवळ देशातच नव्हे तर भाषा प्रांत आणि वयाच्याही सीमा ओलांडून त्यांची गाणी आजही लोकप्रिय आहेत. लता मंगेशकरांचे बंधू ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी श्रद्धांजलिपर लिहिलेल्या लेखात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविषयी लता मंगेशकर यांनी व्यक्त केलेल्या विश्वासाचा उल्लेख केला आहे. लताजींना आदरांजली वाहण्यासाठी संगीताचे विविध कार्यक्रम होत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांनी लता मंगेशकरांना आदरांजली वाहिली आहे.
Site Admin | September 28, 2024 2:13 PM | birth anniversary | lata mangeshkar